Motivational quotes,sms in marathi language for success:
मराठी प्रेरणादायी संदेश, विचार:
आयुष्यात प्रत्येकाला खूप काही मिळवायचं असत, खूप मेहनत करायची असते ... पण प्रत्येकाची मेहनत लगेच त्यांना हवं ते यश मिळवून देत नाही... मग त्या पाठीमागे खूप गोष्टी असतात.. काहींची परिस्तिथी त्यांना साथ देत नाही.. तर कोणाचे नशीब साथ सोडते... पण म्हणून आपण आयुष्य जगणे सोडून द्यायचे नसते...आयुष्य हि आपल्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे... यश - अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच ... पण अपयश आले म्हणून खचून जाऊ नये... अश्या काळात आपल्याला मिळालेले काही प्रेरणादायी विचार आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतात... असेच काही motivational quotes मराठी मध्ये आपल्यासाठी आणले आहेत:
जीवन आहे एक कसोटी
मागे वळून पाहू नका
आली संकटे तर सावराया कोणी येईल
याची कधी वाट पाहू नका
जिंकायचं आहे हे फक्त लक्षात ठेवा
हार लगेच मानू नका
यश तुमच्या जवळच आहे
जिंकल्याशिवाय थांबू नका
जसे छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचा धीर देऊ शकते
तसेच आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देऊ शकत नाही
पण संघर्ष करण्याची ताकद देऊ शकतो
 |
marathi suvichar images,best marathi motivational images,marathi quotes images |
आयुष्यात आनंद निर्माण होतो
तो फक्त परिश्रमातून
राग आणि आळसातून नाही ...
सतत कामात राहिले कि
माणसाचे जीवन सुखी बनते
जे विचार कराल तेच तुम्ही बनाल
तुम्ही दुबळे म्हणाला तर दुबळेच व्हाल
आणि तेजस्वी म्हणाला तर तेजस्वी व्हाल
 |
marathi good thoughts images,best quotes images in marathi HD |