FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label MARATHI POEMS. Show all posts
Showing posts with label MARATHI POEMS. Show all posts

Sunday, 26 November 2017

Marathi Kavita

मराठी कविता संग्रह :


नमस्कार मित्रांनो ,
    मानवाला आपल्या भावना समजावून सांगण्यासाठी शब्दांची खूप गरज असते... आणि जर हेच शब्द एका लयीत बसवून व्यक्त केले तर त्यांची मनावर खूप भारी पकड बनते... एका कवीने भावना व्यक्त करण्यासाठी  रचलेल्या शब्दांची मिळून कविता होते... अश्याच काही छान कविता आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ... एकाच ठिकाणी .... आशा आहे कि तुम्हाला नक्की आवडतील ... प्रथम या कविता रचलेल्या सर्व कवींचे मनापासून आभार मानतो. जर तुम्हाला हि पोस्ट आवडली तर नक्की दुसर्यांना पण पाठवा. 

१. परी मिळावी 

मी कुठे म्हणालो 'परी' मिळावी 
फक्त जरा 'बरी' मिळावी 

प्रयत्न मनापासून आहेत मग 
किमान एक तरी मिळावी 

स्वप्नात तशा खूप भेटतात 
कधीतरी खरी मिळावी ... 

हवीहवीशी एक जखम 
एकदातरी उरी मिळावी 

गालावर खळी नको तिच्या 
फक्त जरा हसरी मिळावी 

चंद्राइतकी सुंदर नकोच
फक्त जरा लाजरी मिळावी

मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी
                      - मंगेश पाडगावकर


२.मनापासून 

खूप प्रेम करते तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू 
आपले मानून बघ 

वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी 
तू फक्त सांगून बघ 
आयुष्यभर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ

तुझ्यासाठीच जगत आहे
तुझ्यावरच मरत आहे 
असला तरी नकार तुझा 
तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे 

वाटलेच कधी तुला तर
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करते... 
तुझ्यावर अगदी मनापासून 

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन,
जरा जागून बघ माझ्यासाठी 
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील 
मनापासून फक्त तुझ्यासाठी. 
                                -सुवर्णा मेस्त्री

लव्ह मराठी कविता,love poem in marathi,marathi kavita


३.विरह 

हलकेच बरसा सरींनो 
चिंब चिंब भिजलो आहे...  

हळुवार या स्वप्नानो 
आताच शांत निजलो आहे... 

विश्राम घ्या पावलांनो जरा 
चालुनिया दूर दूर थकलो आहे... 

दुःखांनो कोसळू नका क्षणभर 

घेऊनिया भार हा उरी , सर्वथा मी वाकलो आहे... 

४.  कणा  

'ओळखलंत का सर मला' पावसात आला कोणी 
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी 

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
'गंगामाई' पाहुणी आली, गेली घरट्यात राहून 

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली 
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली 

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन सांगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला

'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढा म्हणा'.
                                                  - कुसुमाग्रज




५. चुकली दिशा तरीही 

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे 
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे 

मी चालतो अखंड चालायचो म्हणून 
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे 

डरतात वादकांना जे दास त्या ध्रुवाचे 
हे शीड तोडले कि अनुकूल सर्व वारे 

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा 
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे 

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे 
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे 

अशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे 
बेसावधास कसे डसणार हे निखारे 
                                   - विंदा करंदीकर 


६. फुल 

कुठेही असलं तरी
फुलाचं फुलून येणं 
कुणासाठी थोडच असतं 
आणि त्याच फुलाचं 
कोमेजून गळून जाणं
त्याचाही कुणाशी 
संबंध थोडाच असतो?

फुलांना माणसांनी 
चिकटवलेली असोत नाव ,
आपलं नाव सांगताना 
फुलाला पाहिलंय कोणी?

मी तुला एकदा फुल दिल होतं
तुला ते आठवत असेल
किंवा आठवत नसेलही
मला ते अजून आठवतं!
तीच आठवण आली म्हणून
हे सगळं आलं मनात

एखाद ताज फुल असं जरी
मनात आपल्या आपण जपून ठेवलं तरी
नावाची, आठवणीची लटकवलेली
आपली पाटी
फुल थोडंच वाचणार असतं?


Friday, 17 November 2017

होय मि लाभार्थी कविता,Poem on hoy mi labharthi

 होय मि लाभार्थी कविता 

 कवी जगदीश ओहोल जे की  यानि एक कविता मराठी  रचलि आहे "होय मि लाभार्थी".
सरकारने केलेल्या मी लाभार्थी ही जाहिरात बघून मनाला वीट आलाय अशी सर्वसामान्यांची भावना आहे.. याच सर्वसामान्यांच्या मनातील भावना महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व व्याख्याते जगदिश ओहोळ यांनी मी लाभार्थी या कवितेतून मांडल्या आहेत.

"Hoy Mi Labharthi Poem"


मी लाभार्थी ची जाहिरात बघून
आला मनाला वीट
नुसत्या जाहिराती दाखवुनच
सरकार झालेय हिट...!

मनरेगाच बघता बघता
जलयुक्त शिवार झालं
पण भिजवायच काय
समृद्धी महामार्गा सारं वावर गेलं..?

स्वप्नांचा सुकाळ
आणि जाहिरातीची समृद्धी आली
टिव्ही वरच पाणी बघूनच
बापानी पापणी ओली केली..

'या सरकारच पाणीच यगळंच'
हे आता साऱ्यांना पटलंय
आणि अच्छे दिनाच सपान
तीन वर्षातच फिटलंय...!

कर्जमाफीचा उत्सव तुम्ही
लयभारी मांडला
आज उद्या करत करत
शेतकरीच गंडला...।

व्हय मी लाभार्थी
तुमच्या खोट्या स्वप्नाचा
व्हय मी लाभार्थी
न आलेल्या अच्छे दिनाचा

व्हय मी लाभार्थी
न मिळालेल्या शिष्यवृत्तीचा
व्हय मी लाभार्थी
न बांधलेल्या वसतीगृहाचा

व्हय मी लाभार्थी
फक्त कुदळ मारलेल्या इंदूमिलचा
व्हय मी लाभार्थी
फक्त पाणी पूजलेल्या शिवस्मारकाचा

व्हय मी लाभार्थी
न मिळालेल्या मराठा
धनगर आरक्षणाचा
बंद केलेल्या पेन्शनचा

व्हय मी लाभार्थी
साठ हजाराच्या गाण्याच्या तिकिटांचा
व्हय मी लाभार्थी
अक्सिस बँकेच्या अकाउंट चा

व्हय मी लाभार्थी
उबग आलेल्या तुमच्या जाहिरातींचा
व्हय मी लाभार्थी
गरज नसलेल्या बुलेट ट्रेनचा

व्हय मी लाभार्थी
घोटाळा केलेल्या EVM चा
व्हय मी लाभार्थी
रिकाम्या पोटी 'मन की बात' चा

आता माझा एकच प्रश्न
मुख्यमंत्री सायेब तुमाला...
मी 'लाभार्थी' असायला
मी लाचार आहे काय..??

ही कामं करणं
ही तुमची जबाबदारी
अन ती झालीच पाहिजेत
हा माझा हक्क हाय...

खरे लाभार्थी तर तुम्ही हाय,
आम्ही जाहिरातीला फसून
दिलेल्या मतांचे
व्हय तुम्ही लाभार्थी
आमच्या जीवावर खुर्चीचे
ऐशोआरामी जगण्याचे
देशोदेशी फिरण्याचे
व्हय मुख्यमंत्री साहेब तुम्हीच लाभार्थी...!
WWW.FUNFORLIVES.COM

Special Thanks to,
कवी - जगदिश ओहोळ, पुणे
कविता मनापासून आवडली तर सर्वांना पाठवा.

 tags
Poem on BJP government,BJP insulting Poem,Mi labharthi bjp,मि लाभार्थी भाजपा ,कविता,kavita mi labharthi ,bharatiy janata party insulting poems

Wednesday, 22 March 2017

Relationship quotes in marathi, मराठी नाती कविता

 मराठी नाती सुंदर अर्थ आणि विचार: 


नाती म्हणजे काय?:

   ||   *आई- वडील*  ||

सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं,
आपल्या घराची जीवित दैवत, 
तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, 
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर.


        || *गुरुजन* ||

आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
 मानवतेचे महादूत.

  || *आजी - आजोबा* ||

आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश,
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती.

       || *सासू - सासरे* ||

आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप.

   || *काका - मावशी* || 

आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी.

       || *आत्या - मामा* ||

वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती.
           

  || *मामा*|| 

मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा, आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार.
          

  || *मामी* ||

आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती.
          

 || *दाजी*||  

आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक.
       

   || *बहिण* ||

आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका,
 कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका.
         

  || *भाऊ* ||

आपल्या हिमतीच्या धमन्या, आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं,
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं,
आपल्या आवाजातील निनाद.
          

 ||  *साडु* || 

एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं.
इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ.
       

  || *मेहुणी* ||

आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता,
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी.

 
 || *मावस भाऊ - बहीण* || 

बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस, 
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय.

 || *मेव्हणा भाऊ - बहीण* ||

नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी,
थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग.
    

 || *भाचे - भाची* ||

संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे,
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं.
       

   || *पुत्र* || 

भविष्याचा प्रकाश, अस्तित्वाचा अर्थ,
वंशाचा कुलदीपक,कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी.

        || *मुलगी*  ||

पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण,
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी,
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक,
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा, जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती.
     

    || *नातवंडे* ||

दुधावरली साय, आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा,
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट.
         

 || *मित्र मैत्री* || 

ईश्वरी वरदान, रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं,
 विश्वासाची आधारशीला,  स्वतःचेच प्रतिरुप.
       

 || *शेजार धर्म* ||

मानवी मूल्यांचा ओझोन, संस्कृतीचा संधीप्रकाश,
आपल्या  सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन.
    

   || *शिष्य* ||

आपल्या कर्तृत्वाचा कळस व
आपल्या कौशल्याची किरणं.
खरंच .... "माणुस" नाते जपतो का ?
जो जपतो नात तोच खरा  माणुस .  
नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच ! नाही का ?
नाते जपा.......नाते टिकवा........! 
माणुस म्हणुन जगा...... " हे जीवन पुन्हा नाही "..........!
         

Tags:नाते जपताना,नातेसंबंध शायरी sms,marathi nati quotes,marathi love suvichar,naate marathi kavita,marathi kavita nati,suvichar in marathi and meaning,nate marathi sms,nati charolya,saglyat sundar nate,marathi kavita,
नाती म्हणजे काय,नातेसंबंध कसे असतात

बेस्ट मराठी कविता

Marathi poem on life in marathi font:

Marathi poem for kids:

ए आई मला पावसात जाऊ दे,
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होउ दे..
मेघ कसे बघ गडगड करिती,
विजा नभांतुनी मला खुणविती,
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचू दे..
खिडकीखाली तळे साचले
गुडघ्याइतके पाणी भरले
तर्हेतर्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावू दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करू दे
धारेखाली उभी राहुनी
पायाने मी उडवीन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी वाटेल ते होउदे
ए आई मला पावसात जाऊ दे



Marathi poem on childhood
भूतकाळात डोकावल्या शिवाय
मजा काही मिळत नाही
मागे वळून पाहिल्यावर
हसावं का रडावं कळत नाही
old days marathi poem
साऱ्याच गोष्टी मधे
खूप खूप बदल झाले
पहिल्या पेक्षा प्रत्येकाला
नक्कीच बरे दिवस आले
marathi poem on change
खरं वाटणार नाही पण
एवढं सगळं बदललं
निगरगट्ट माणूस सुद्धा
मुळा सकट हादरलं
childhood study poem
शाळेतून घरी गेल्या गेल्या
दप्तर कोनाड्यात जायचं
दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना
बाहेर काढल जायचं
childhood memories poems
अहो दप्तर म्हणजे काय
वायरची पिशवी असायची
जुन्या फाटक्या पुस्तका सोबत
फुटकी पाटी दिसायची
old days study marathi kavita
अभ्यास कर म्हणून कुणी
म्हणलंही नाही
अन मार्क कमी पडले म्हणून
हाणलंही नाही
poor but happy kavita poem
कोणताही ऋतू असो
काळपट चहा असायचा
तडकलेल्या बशीवर
कानतुटका कप दिसायचा
marathi poem on poority is happinesses
बारा महिने अनवाणी पाय
चप्पल म्हणजे श्रीमंती
पायाला चटके बसायचे
पण सगळ्या गावात हिंडायचे
कुणाचं गुर्हाळ लागलं की
चला रस प्यायला
खळे दळे लागले की
चालले शेतात झोपायला
family poem marathi
मरणाची गरिबी होती
पण मजा मात्र खूप
लग्ना कार्यात माणसं , नाती
व्हायची एकरूप
तेलच्या-गुळवणी आणि पापडांची
काय मामलात होती
तरीही त्या माणसां मधे
माणुसकी होती
रात्र रात्र गप्पा व्हायच्या
डोळ्यात यायचं पाणी
आडपडदा न ठेवता
दुःखाची व्हायची गाणी
olden days are golden days marathi poem
कुठे गेला तो साधेपणा
कुठे गेलं ते सुख  ?
खरं सांगा पहिल्या सारखी
लागते का आता भूक ?
इतकुसाक पेढ्याचा तुकडा
मिडकू मिडकू खायचा
कधी तरी कुणी तरी
प्रसाद म्हणून द्यायचा
junya divsanvar marathi kavita
सारं सारं संपून गेलं
आता पैसा बोलत असतो
माणूस मात्र भ्रमिष्ठा सारखा
खोटं खोटं डोलत असतो
पेढ्याच्या बाॅक्स कडे
ढुंकूनही कुणी पहात नाही
एवढंच काय पहिल्या सारख्या
मुंग्याही लागत नाही
सुखाचं बोट कधी सुटलं
आपल्या लक्षात आलं नाही
श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं
तसं काही झालं नाहीे
ते सुख आणि वैभव
पुन्हा घरात येईल का ?
आईच्या घरा  मधून
हसण्याचा आवाज येईल का?

मराठी विनोदी कविता:

कोंबडीच्या अंड्यामधून
बाहेर आले पिल्लू ,
अगदी होते छोटे
आणि उंचीलाही टिल्लू...

कोंबडी म्हणाली पिल्लूबाय 
सांग तुला हवे काय?
किडे हवे तर कोडे,
दाणे हवे तर दाणे 
आणून देईन तुला हवे असेल ते खाणे... 

पिल्लू म्हणाले आई 
दुसरे काही नको 
छोट्याश्या कपामध्ये चहा भरून दे 
मला एका अंड्याचे ऑम्लेट करून दे. 
🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤

Marathi kavita on life:

घरात टि व्ही आल्यापासून मी बोलणं विसरलो आहे 
दारात गाडी आल्यापासून मी चालणं विसरलो आहे 
खिशात calculator आल्यापासून पाढे म्हणणं विसरलो आहे 
ऑफिसमधल्या ए सी मध्ये बसून झाडाखालचा गारवा  विसरलो आहे

रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलो आहे 
मनालाच इतके श्रम होतात शरीराचे कष्ट विसरलो आहे
कचकड्यांची नाती जपताना प्रेम करायला विसरलो आहे 
बॅंकातली खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरलो आहे 

उत्तेजक चित्रांच्या बरबत्तीमुळे सौन्दर्य पहाणं विसरलो आहे 
कृत्रिम सेंटच्या वासामुळं फुलांचा सुगंध विसरलो आहे 
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचा ढेकर विसरलो आहे 
पॉप रॉकच्या दणदणाटात संगीत समाधी विसरलो आहे 

सतत धावत असताना 
क्षणभर थांबणं विसरलो आहे 
जागेपणीचे सुख जाऊच द्या 
सुखं झोपणं विसरलो आहे.  





Tags:marathi kavita on life,marathi funny poem,marathi poem for kids,chidhood memories best marathi poem,best marathi kavita,marathi kavinchya kavita marathi fontmadhe,मराठी विनोदी कविता

Tuesday, 21 March 2017

मराठी कविता आई poem for mother in marathi font

Marathi kavita for Mother:

 

mazi aai marathi kavita:

"आई"
एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं ...

सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच
तरीही नाही म्हणवत नाही...

जत्रा पांगते पालं उठतात,
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेवून जाते काही,
जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेंव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात कि सैरावैरा धावायलाही कमी पडत रान ...

पिकं येतात जातात,
माती मात्र व्याकुळच ...
तिची कधीच भागात नाही तहान,
दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल
कि सापडते अंतःकरणातील खाण.

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात
गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?

आई खरंच काय असते ?
लंगड्याचा पाय असते
वासराची गाय असते
दुधावरची साय असते,
लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही
           - फ. मु. शिंदे 


आई,indian mother images,kavita aaisathi




Marathi poem on aai:

कळतच नव्हतं मला, 
माय माझी एकटीच का रडायची??? 
तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची.. 

माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची... 
काय पाहत होती कोणास ठाऊक
पण पदराखाली मला घट्ट धरून बसायची.

पाऊस नव्हता तरी सुद्धा माझ्या अंगावर थेंब पडायची, 
मांडीवर मला थोपटताना तिची का झोप उडायची .. 
काहीच नव्हते घरात तरी ती घराला फार जपायची, 
एकच होत लुगडं तिला तेच ती धुवून रोज नेसायची ..

सणावाराच्या दिवशी मात्र माझ्यावर करडी नजर ठेवायची,
जाऊ नये कुणाच्या घरी म्हणूंन मला घरातच लाडीगोडी लावायची.. 
रोजच सकाळी हात जोडून देवाला काहीतरी मागायची, 
गालावर हात फिरवून माझ्या बोटे तिच्या डोक्यावरती मोडायची..  

मातीच्या होत्या भिंती पांढऱ्या मातीनेच लिंपायची, 
अंगणात टाकायची सडा नि, 
घर शेणाने सुंदर सारवायची... 

सकाळीही रोजच मला घासून अंघोळ घालायची, 
चुलीवरच्या भाकरीचा घास तिच्या हातानेच भरवायची...  
शाळेत मला धाडताना स्वप्ने मोठमोठी बघायची, 
सांजच्याला थकायचा चेहरा तिचा तरी माझ्याकडे पाहून हसायची... 

कळतच नव्हतं मला, माय माझी एकटीच का रडायची 
तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची??



आई मराठी कविता :

आई तुझ्या कुशीत,पुन्हा यावेसे वाटते,
निर्दयी या जगापासून, दूर जावेसे वाटते ...
कोणी न इथे कोणाचा, सारीच नाती खोटी,
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते...
कोळून प्यायलो मी सुख दुःख सारे,
माते तुझ्या विरहास प्यावेसे वाटते..
कित्येक रात्री ऐश्वर्यात लोळलो मी,
अखेरच्या क्षणाला तुझ्या कुशीत निजावेसे वाटते..
दगडातला देवही आता ,नवसाविना पावेन,
निस्वार्थ हृदय माउली, तुलाच पूजावेसे वाटते..
असेल जर मजला मानव जन्म कधी,
आई तुझ्याच जन्मी पुन्हा जन्मावेसे वाटते.




Marathi kavita aai sathi:

"आई"
सकाळी सकाळी धपाटे घालून उठवते...
ती असते आई
उठल्या उठल्या आवडीचा नाश्ता बनवून देते...
ती असते आई
नाश्ता संपवायच्या आत डब्याची काळजी घेते...
ती असते आई
काय करीन ते घेऊन जा म्हणताना सगळं काही आवडीचे करून देते...
ती असते आई
साडीला हात पुसत व्यवस्थित जा म्हणते...
ती असते आई
परतण्याची आतुरतेने वाट बघत असते...
ती असते आई
आपण झोपेपर्यंत सतत जागी राहते..
ती असते आई
आणि जिच्याशिवाय आपलं संपूर्ण आयुष्यच अपूर्ण असते...
ती असते आई



Tags:great marathi kavita,marathi kavita on aai,poem for mother,beautiful marathi poem on mother,aai vr marathi kavita,marathi kavita aai sathi,mazi aai marathi kavita,marathi kavita aai baba,marathi poem for mother,आई मराठी कविता,
आईसाठी कविता,कविता माझ्या आईसाठी,सुंदर मराठी कविता आईसाठी 

Wednesday, 8 March 2017

Marathi love poem for proposing a girl

latest Beautiful Marathi poem for your dream girl:


Hi friends,
Here i write a poem on expressing your lovely feeling with a girl whom you love from your bottom of heart.
You can use this poem for proposing your crush and also sharing your feelings/emotions.


एक सोबती एक पाखरू,
तुझ्या असण्याने माझ्या जिवनात
आनंद लागलाय बहरू...

तू ,
एक गोड व्यक्तिमत्त्व,
तुझ्याशी बोलण्यामुळे माझ्या
प्रत्येक दिवसाला येते खूप महत्त्व...

तुझी स्वप्न पाहताना दगड सुद्धा
होतो माझी उशी,
स्वप्नातील तुझ्या गोड हसण्यामुळे,
मला होते खूप खूप ख़ुशी...

तुझ्या मैत्रीचे नाते जपलेय मी
माझ्या उराशी...
आणि खरच तू कधीतरी " हो "
म्हणशील अशी अपेक्षा आहे थोडीशी.

love images,cartoon love images,propose images


तुझ्या सुंदर रुपाला
साथ आहे विचारांची "निरागस आणि सच्चा",
तू नेहमी खुश राहावी हीच आमची देवाकडे मनापासून  इच्छा.

तू आहेस माझ्या जीवनाची एक दिशा,
तू कधीतरी हो म्हणशील अशी माझी भोळी अशा.

तुला पाहताना कधी कधी वाटत,
 कोणीतरी असावी,
गालातल्या गालात हसणारी,
जर डोळे भरले अश्रुनी तर,
डोळे माझी पुसणारी.

मी शेवटी एकच तुला सांगू इच्छितो ,
हातात हात घेशील जेंव्हा,
आयुष्यभर माझी साथ असेल,
भिती  तुला कसलीच नसेल....
अंधारातील काजवही तेंव्हा,
सूर्यापेक्षा तेजस्वी दिसेल.

लव images,cute love couple,cute love couple  HD images


Tags:Marathi prem kavita,best Marathi kavita,global marathi-marathi kavita/poems,marathi kavita on love,marathi poem on love,poem for your love,poem for girlfriend,बेस्ट मराठी कविता,मराठी लव कविता,मराठी प्रेम कविता. 

Saturday, 28 January 2017

Poem on bad Girls:playing girls

मराठी कविता फसवणार्या मुलींवर 

मराठी कविता ,marathi poem,mulansathi,mulini misuse kelelya,love poems, MARATHI POEMS, POEMS, 

पोरी महागात पडतात..

खरच सांगतो पोरंनो.
पोरी महागात पडतात..
तुम्हाला काय, मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो...

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो...
हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो...

कधी इकडे, कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो...

याला फीरव, त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित, कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो...

कधी सेंट, कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो...

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,
पोरी महागात पडतात...!!

टैग्स
 मराठी पोएम,मराठी कविता,marathi poems,emotional ,bad girls misusing boys poem in marathi,मुलांचा उसे करूँ घेणाऱ्या मुलींवर कविता ,love poems, MARATHI POEMS, POEMS, 

Friday, 27 January 2017

Poem on "all boys are not wrong" by a girl.

very good & true Poem on Boys in  marathi what girls thinks about boys poem



सगळीच मुलं वाईट नासतात 
marathi poem kavita on love,boys poem,मराठी कविता
marathi poem kavita on love,boys poem,मराठी कविता,what girls thinks about boys poem


मुलींनी तर हे नक्कीच वाचाव ,

मी  असाच एक खेळ करून पहिला . मी मुलींना माझा मैत्रिणींना विचारला . 
"मुलांबद्दल तुमचे काय विचार आहेत?"
तर त्यात भरपूर मुलींची उत्तर अशा प्रकारची होती. 
'टपोरी असतात , खोटारडी असतात आणि सर्वात जास्त बोललेली वाक्ये म्हणजे "सगळीच मुले सारखी नसतात "
पण खरंतर सगळी मुलं हि सारखी नसतात. 
मुळात सगळी मुलं हि चांगलीच असतात हेही बरोबर नाही .... 

मुलींना hurt  झाला कि त्या ढसाढसा रडतात .... 
पण त्यांना काय माहित मुलं hurt  झाल्यावर ,तोंडावर दुःख ना दाखवता ,कुठेतरी एकांतात ,
नाहीतर रात्री अंथरुणात रडतात . ... 
जिच्यावर प्रेम करतात तिला सुखी ठेव रे देवा अशीच प्रार्थना करतात. पण मुलींना मात्र मुलं हि वाईटच दिसतात !!

प्रेयसीसाठी किती झोल करतात ..... 
पण तिने धोका दिल्यावर मित्रांकडून घेतलेले उसनाच फेडत बसतात ........ 
आई-वडिलांपेक्षा जास्त आपल्या प्रेयसीचा ऐकतात . 
आणि मुलींना वाटत मुलं वाईटच असतात .!!!
जीवापाड प्रेम करतात आणि काहीही करायला तयार असतात . 
पण मुली साला काहीतरी चूक काढून सारा आत्मविश्वासाचं संपवतात .. 

स्वतः अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवतात ,पण मी फक्त तिमेपास करत होते असा सांगून सांगून त्याचा अभ्यासाची वाट लावतात .... 
कारण त्यांना वाटत सगळी मुलं हि सारखीच असतात. !!!
मुलीचा लग्न ठरल्यावर बॉयफ्रेंड ला नकार देऊन ,सगळं दोष त्यालाच देतात .. 
पण तिला काय माहित ती खुश राहावी म्हणून किती धडपडत असतात ... 
आणि त्यांना वाटत , "मुलं हि सगळी वाईटच असतात "!!

आयुष्याची राखरांगोळी करून जेंव्हा त्या मुली जातात .... 
पण तिची बदनामी होऊ नये म्हणून सगळं मुकाट्याने सहन करतात . 
आणि त्यांना वाटत सगळी मुलं हि वाईटच असतात.!!

ती गेली तर जाऊदे,उद्या दुसरी शोधू  असा फक्त मित्रांचा तोंडावर बोलतात. 
पण एकांतात बसून तिचाच आठवणीत रडतात,आणि कोणी पाहिल्यावर 
"काय नाय रे डोळ्यात कचरा गेला म्हणून पाणी आल"असा म्हणणारी पण मुलाचं असतात/
आणि मुलींना वाटत सगळीच मुलं वाईटच असतात!!

खरंतर १०० मधली ७५ मुलं वाईट असतात !!
पण या ७५ मुलांची वाट लावून त्यांना तास वागायला भाग पडणाऱ्या हि मुलीच  असतात 
आणि मुलींना वाटत सगळीच मुले वाईट असतात!!

कधीतरी मुलांचा भावना खऱ्या मानाने समजून घ्या ,कारण ,हाताची पाचही बोट सारखी नसतात ,
आणि सगळीच मुलं सारखीच नसतात !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

special thanks to

कवीचे नाव  = सोनाली इंगोले 

टॅग्स 
मराठी कविता ,मराठी प्रेम कविता ,विरह कविता इन मराठी,मुलांवर कविता,poems on boys,love poem in marathi,emotional poem,poem written by college student,मराठी कविता व लव्ह,मराठी कविता व बोयस,बेस्ट मराठी लव्ह ,marathi love kavita,marathi kavita on boys,prem kavita marathi,best kavita
what girls thinks about boys poem








Monday, 16 January 2017

Marathi love poems

love poems by unknown writers


किती छान आहे ना आजची संध्याकाळ 
का कोणाची आठवण करून देत आहे हि संध्याकाळ 
तो बेधुंध वारा 
हलणारी ती झाडे त्यांचा तो आवाज 
इकडे तिकडे भटकणारे पक्षी त्यांचा तो किलबिलाट 
परतीचा वाटेवर जातानाचा त्यांचा सुंदर आवाज 
कला निळा झालेला तो आकाश 
त्यात कुठेतरी कडाडणारी ती वीज 
कोणाचीतरी आठवण करून देत आहेस 
हवेतील गारवा मनाला का इतका आज स्पर्श करून जात आहे . 
हळूच मध्ये मध्ये पडणारे पावसाचे ते थेम्ब .. 
मनाला का भिजवून जात आहेत 
पावसाचा थेंबाचा स्पर्श कोणाचातरी स्पर्शाची आठवण करून देत आहेत 
का आज तिचा आठवणीत मनसोक्त भिजवास वाटत आहे 
खरंच किती रोमँटिक वातावरण आहे ना 
आजची संध्याकाळ फक्त तुझं आणि तुझा आठवणींची 

from my friend
sadanand mutkekar

Whatsapp marathi messeges,hurt touching sms

Love images,shayari,sms and poems in marathi and hindi

Love images,shayari,sms and poems in marathi and hindi



  • Marathi poem 1

आग्रह तिचा फार होता
म्हणून तोल माझा जात होता ...

                                  वाटले पडताना ती सावरेल,
                                  माझ्या भावनांना ती आवरेल...

पण आवरणे न्हवे , सावरणे न्हवे ,
तर पाडणे हाच तिचा उद्देश होता..

                                  शब्द प्रत्येक खरा वाटत होता
                                  म्हणूनच स्वप्नात सारा संसार मांडला होता ...

पण हसून एक दिवस तीच म्हणाली .
विसर वेड्या हा तर TIMEPASS होता.

**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**

love images

marathi poem 2