गुढीपाडवा महत्त्व :गुढी पाडवा का साजरा करतात .
![]() |
गुढीपाडवा माहिती,मराठी सण गुढीपाडवा,gudhipadwa special,gudi padwa information,happy gudi padwa |
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्र या दिवशी आरंभ होतो. नववर्षारंभ म्हणजे गुढीपुडवा. या सणाबद्दल खूप आख्यायिका सांगितल्या जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून दारासमोर रांगोळी काढावी, सुगंधी तेल लावून अंघोळ करावी. देवाची पूजा करावी.
सूर्योदयानंतर काही वेळातच गुढी उभी करावी कारण सूर्योदयाच्या वेळी निर्माण होणारे चैतन्य हे जास्त वेळ टिकते आणि आपल्या मनात पण चैतन्य तयार करते. दाराला तोरण बांधावे. गुढीची काठी स्वच्छ धुवून घ्यावी, तिला टोकाला रेशमी वस्त्र लावून, त्यावर साखरपाकची माळ आणि चाफ्याची फुलाची माळ घालावी आणि त्यावर एक भांडे (तांब्या) उलटा करून घालावा. गुढीला आंब्याची पाने वापरली जातात कारण आंब्याच्या पानात सात्विकपणा जास्त असतो, आणि कडुनिंब हे सर्वात महत्वाचे असते कारण असे मानले जाते कि कडुनिंब हे आरोग्यदायी तर आहेच पण त्यामध्ये ईश्वरी शक्ती खेचून घेण्याची क्षमता जास्त असते.
आणि नंतर या गुढीची मनोभावे पूजा करावी.
![]() |
gudhipadwa ka sajra kela jato, why do we celebrate gudi padwa,gudi padvyachya shubhhecha,गुढीपाडव्याच्या शुभेच्छा |