FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label marathi kavita. Show all posts
Showing posts with label marathi kavita. Show all posts

Sunday, 26 November 2017

Marathi Kavita

मराठी कविता संग्रह :


नमस्कार मित्रांनो ,
    मानवाला आपल्या भावना समजावून सांगण्यासाठी शब्दांची खूप गरज असते... आणि जर हेच शब्द एका लयीत बसवून व्यक्त केले तर त्यांची मनावर खूप भारी पकड बनते... एका कवीने भावना व्यक्त करण्यासाठी  रचलेल्या शब्दांची मिळून कविता होते... अश्याच काही छान कविता आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ... एकाच ठिकाणी .... आशा आहे कि तुम्हाला नक्की आवडतील ... प्रथम या कविता रचलेल्या सर्व कवींचे मनापासून आभार मानतो. जर तुम्हाला हि पोस्ट आवडली तर नक्की दुसर्यांना पण पाठवा. 

१. परी मिळावी 

मी कुठे म्हणालो 'परी' मिळावी 
फक्त जरा 'बरी' मिळावी 

प्रयत्न मनापासून आहेत मग 
किमान एक तरी मिळावी 

स्वप्नात तशा खूप भेटतात 
कधीतरी खरी मिळावी ... 

हवीहवीशी एक जखम 
एकदातरी उरी मिळावी 

गालावर खळी नको तिच्या 
फक्त जरा हसरी मिळावी 

चंद्राइतकी सुंदर नकोच
फक्त जरा लाजरी मिळावी

मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी
                      - मंगेश पाडगावकर


२.मनापासून 

खूप प्रेम करते तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू 
आपले मानून बघ 

वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी 
तू फक्त सांगून बघ 
आयुष्यभर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ

तुझ्यासाठीच जगत आहे
तुझ्यावरच मरत आहे 
असला तरी नकार तुझा 
तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे 

वाटलेच कधी तुला तर
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करते... 
तुझ्यावर अगदी मनापासून 

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन,
जरा जागून बघ माझ्यासाठी 
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील 
मनापासून फक्त तुझ्यासाठी. 
                                -सुवर्णा मेस्त्री

लव्ह मराठी कविता,love poem in marathi,marathi kavita


३.विरह 

हलकेच बरसा सरींनो 
चिंब चिंब भिजलो आहे...  

हळुवार या स्वप्नानो 
आताच शांत निजलो आहे... 

विश्राम घ्या पावलांनो जरा 
चालुनिया दूर दूर थकलो आहे... 

दुःखांनो कोसळू नका क्षणभर 

घेऊनिया भार हा उरी , सर्वथा मी वाकलो आहे... 

४.  कणा  

'ओळखलंत का सर मला' पावसात आला कोणी 
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी 

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
'गंगामाई' पाहुणी आली, गेली घरट्यात राहून 

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली 
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली 

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन सांगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला

'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढा म्हणा'.
                                                  - कुसुमाग्रज




५. चुकली दिशा तरीही 

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे 
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे 

मी चालतो अखंड चालायचो म्हणून 
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे 

डरतात वादकांना जे दास त्या ध्रुवाचे 
हे शीड तोडले कि अनुकूल सर्व वारे 

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा 
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे 

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे 
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे 

अशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे 
बेसावधास कसे डसणार हे निखारे 
                                   - विंदा करंदीकर 


६. फुल 

कुठेही असलं तरी
फुलाचं फुलून येणं 
कुणासाठी थोडच असतं 
आणि त्याच फुलाचं 
कोमेजून गळून जाणं
त्याचाही कुणाशी 
संबंध थोडाच असतो?

फुलांना माणसांनी 
चिकटवलेली असोत नाव ,
आपलं नाव सांगताना 
फुलाला पाहिलंय कोणी?

मी तुला एकदा फुल दिल होतं
तुला ते आठवत असेल
किंवा आठवत नसेलही
मला ते अजून आठवतं!
तीच आठवण आली म्हणून
हे सगळं आलं मनात

एखाद ताज फुल असं जरी
मनात आपल्या आपण जपून ठेवलं तरी
नावाची, आठवणीची लटकवलेली
आपली पाटी
फुल थोडंच वाचणार असतं?


Friday, 17 November 2017

होय मि लाभार्थी कविता,Poem on hoy mi labharthi

 होय मि लाभार्थी कविता 

 कवी जगदीश ओहोल जे की  यानि एक कविता मराठी  रचलि आहे "होय मि लाभार्थी".
सरकारने केलेल्या मी लाभार्थी ही जाहिरात बघून मनाला वीट आलाय अशी सर्वसामान्यांची भावना आहे.. याच सर्वसामान्यांच्या मनातील भावना महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व व्याख्याते जगदिश ओहोळ यांनी मी लाभार्थी या कवितेतून मांडल्या आहेत.

"Hoy Mi Labharthi Poem"


मी लाभार्थी ची जाहिरात बघून
आला मनाला वीट
नुसत्या जाहिराती दाखवुनच
सरकार झालेय हिट...!

मनरेगाच बघता बघता
जलयुक्त शिवार झालं
पण भिजवायच काय
समृद्धी महामार्गा सारं वावर गेलं..?

स्वप्नांचा सुकाळ
आणि जाहिरातीची समृद्धी आली
टिव्ही वरच पाणी बघूनच
बापानी पापणी ओली केली..

'या सरकारच पाणीच यगळंच'
हे आता साऱ्यांना पटलंय
आणि अच्छे दिनाच सपान
तीन वर्षातच फिटलंय...!

कर्जमाफीचा उत्सव तुम्ही
लयभारी मांडला
आज उद्या करत करत
शेतकरीच गंडला...।

व्हय मी लाभार्थी
तुमच्या खोट्या स्वप्नाचा
व्हय मी लाभार्थी
न आलेल्या अच्छे दिनाचा

व्हय मी लाभार्थी
न मिळालेल्या शिष्यवृत्तीचा
व्हय मी लाभार्थी
न बांधलेल्या वसतीगृहाचा

व्हय मी लाभार्थी
फक्त कुदळ मारलेल्या इंदूमिलचा
व्हय मी लाभार्थी
फक्त पाणी पूजलेल्या शिवस्मारकाचा

व्हय मी लाभार्थी
न मिळालेल्या मराठा
धनगर आरक्षणाचा
बंद केलेल्या पेन्शनचा

व्हय मी लाभार्थी
साठ हजाराच्या गाण्याच्या तिकिटांचा
व्हय मी लाभार्थी
अक्सिस बँकेच्या अकाउंट चा

व्हय मी लाभार्थी
उबग आलेल्या तुमच्या जाहिरातींचा
व्हय मी लाभार्थी
गरज नसलेल्या बुलेट ट्रेनचा

व्हय मी लाभार्थी
घोटाळा केलेल्या EVM चा
व्हय मी लाभार्थी
रिकाम्या पोटी 'मन की बात' चा

आता माझा एकच प्रश्न
मुख्यमंत्री सायेब तुमाला...
मी 'लाभार्थी' असायला
मी लाचार आहे काय..??

ही कामं करणं
ही तुमची जबाबदारी
अन ती झालीच पाहिजेत
हा माझा हक्क हाय...

खरे लाभार्थी तर तुम्ही हाय,
आम्ही जाहिरातीला फसून
दिलेल्या मतांचे
व्हय तुम्ही लाभार्थी
आमच्या जीवावर खुर्चीचे
ऐशोआरामी जगण्याचे
देशोदेशी फिरण्याचे
व्हय मुख्यमंत्री साहेब तुम्हीच लाभार्थी...!
WWW.FUNFORLIVES.COM

Special Thanks to,
कवी - जगदिश ओहोळ, पुणे
कविता मनापासून आवडली तर सर्वांना पाठवा.

 tags
Poem on BJP government,BJP insulting Poem,Mi labharthi bjp,मि लाभार्थी भाजपा ,कविता,kavita mi labharthi ,bharatiy janata party insulting poems

Tuesday, 21 March 2017

मराठी कविता आई poem for mother in marathi font

Marathi kavita for Mother:

 

mazi aai marathi kavita:

"आई"
एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं ...

सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच
तरीही नाही म्हणवत नाही...

जत्रा पांगते पालं उठतात,
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेवून जाते काही,
जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेंव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात कि सैरावैरा धावायलाही कमी पडत रान ...

पिकं येतात जातात,
माती मात्र व्याकुळच ...
तिची कधीच भागात नाही तहान,
दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल
कि सापडते अंतःकरणातील खाण.

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात
गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?

आई खरंच काय असते ?
लंगड्याचा पाय असते
वासराची गाय असते
दुधावरची साय असते,
लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही
           - फ. मु. शिंदे 


आई,indian mother images,kavita aaisathi




Marathi poem on aai:

कळतच नव्हतं मला, 
माय माझी एकटीच का रडायची??? 
तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची.. 

माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची... 
काय पाहत होती कोणास ठाऊक
पण पदराखाली मला घट्ट धरून बसायची.

पाऊस नव्हता तरी सुद्धा माझ्या अंगावर थेंब पडायची, 
मांडीवर मला थोपटताना तिची का झोप उडायची .. 
काहीच नव्हते घरात तरी ती घराला फार जपायची, 
एकच होत लुगडं तिला तेच ती धुवून रोज नेसायची ..

सणावाराच्या दिवशी मात्र माझ्यावर करडी नजर ठेवायची,
जाऊ नये कुणाच्या घरी म्हणूंन मला घरातच लाडीगोडी लावायची.. 
रोजच सकाळी हात जोडून देवाला काहीतरी मागायची, 
गालावर हात फिरवून माझ्या बोटे तिच्या डोक्यावरती मोडायची..  

मातीच्या होत्या भिंती पांढऱ्या मातीनेच लिंपायची, 
अंगणात टाकायची सडा नि, 
घर शेणाने सुंदर सारवायची... 

सकाळीही रोजच मला घासून अंघोळ घालायची, 
चुलीवरच्या भाकरीचा घास तिच्या हातानेच भरवायची...  
शाळेत मला धाडताना स्वप्ने मोठमोठी बघायची, 
सांजच्याला थकायचा चेहरा तिचा तरी माझ्याकडे पाहून हसायची... 

कळतच नव्हतं मला, माय माझी एकटीच का रडायची 
तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची??



आई मराठी कविता :

आई तुझ्या कुशीत,पुन्हा यावेसे वाटते,
निर्दयी या जगापासून, दूर जावेसे वाटते ...
कोणी न इथे कोणाचा, सारीच नाती खोटी,
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते...
कोळून प्यायलो मी सुख दुःख सारे,
माते तुझ्या विरहास प्यावेसे वाटते..
कित्येक रात्री ऐश्वर्यात लोळलो मी,
अखेरच्या क्षणाला तुझ्या कुशीत निजावेसे वाटते..
दगडातला देवही आता ,नवसाविना पावेन,
निस्वार्थ हृदय माउली, तुलाच पूजावेसे वाटते..
असेल जर मजला मानव जन्म कधी,
आई तुझ्याच जन्मी पुन्हा जन्मावेसे वाटते.




Marathi kavita aai sathi:

"आई"
सकाळी सकाळी धपाटे घालून उठवते...
ती असते आई
उठल्या उठल्या आवडीचा नाश्ता बनवून देते...
ती असते आई
नाश्ता संपवायच्या आत डब्याची काळजी घेते...
ती असते आई
काय करीन ते घेऊन जा म्हणताना सगळं काही आवडीचे करून देते...
ती असते आई
साडीला हात पुसत व्यवस्थित जा म्हणते...
ती असते आई
परतण्याची आतुरतेने वाट बघत असते...
ती असते आई
आपण झोपेपर्यंत सतत जागी राहते..
ती असते आई
आणि जिच्याशिवाय आपलं संपूर्ण आयुष्यच अपूर्ण असते...
ती असते आई



Tags:great marathi kavita,marathi kavita on aai,poem for mother,beautiful marathi poem on mother,aai vr marathi kavita,marathi kavita aai sathi,mazi aai marathi kavita,marathi kavita aai baba,marathi poem for mother,आई मराठी कविता,
आईसाठी कविता,कविता माझ्या आईसाठी,सुंदर मराठी कविता आईसाठी