गुढीपाडवा महत्त्व :गुढी पाडवा का साजरा करतात .
गुढीपाडवा माहिती,मराठी सण गुढीपाडवा,gudhipadwa special,gudi padwa information,happy gudi padwa |
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्र या दिवशी आरंभ होतो. नववर्षारंभ म्हणजे गुढीपुडवा. या सणाबद्दल खूप आख्यायिका सांगितल्या जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून दारासमोर रांगोळी काढावी, सुगंधी तेल लावून अंघोळ करावी. देवाची पूजा करावी.
सूर्योदयानंतर काही वेळातच गुढी उभी करावी कारण सूर्योदयाच्या वेळी निर्माण होणारे चैतन्य हे जास्त वेळ टिकते आणि आपल्या मनात पण चैतन्य तयार करते. दाराला तोरण बांधावे. गुढीची काठी स्वच्छ धुवून घ्यावी, तिला टोकाला रेशमी वस्त्र लावून, त्यावर साखरपाकची माळ आणि चाफ्याची फुलाची माळ घालावी आणि त्यावर एक भांडे (तांब्या) उलटा करून घालावा. गुढीला आंब्याची पाने वापरली जातात कारण आंब्याच्या पानात सात्विकपणा जास्त असतो, आणि कडुनिंब हे सर्वात महत्वाचे असते कारण असे मानले जाते कि कडुनिंब हे आरोग्यदायी तर आहेच पण त्यामध्ये ईश्वरी शक्ती खेचून घेण्याची क्षमता जास्त असते.
आणि नंतर या गुढीची मनोभावे पूजा करावी.
gudhipadwa ka sajra kela jato, why do we celebrate gudi padwa,gudi padvyachya shubhhecha,गुढीपाडव्याच्या शुभेच्छा |
काही महत्वाची माहिती:
काही लोकांना हा प्रश्न असतो कि गुढीपाडवा का साजरा करतात. तर या सणाबद्दल खूप साऱ्या ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या जातात.त्यापैकी एक म्हणजे या दिवशी मराठा राजा शिवाजी महाराज यांनी विजय मिळवला. त्या विजयाची गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणजे गुढीपाडवा. दुसरे एक कारण कारण सांगितले जाते ते म्हणजे या दिवशी ब्रह्मदेवाने या ब्रह्माण्डाची निर्मिती केली,या दिवसापासून या जगाची निर्मिती झाली म्हणून हा सण साजरा केला जातो. काही लोकांच्या मते या दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येला परत आले, म्हणून लोकांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले. गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जाते.गुढीपाडव्याला नववर्षात पदार्पण करताना नवीन वर्ष शुभ जाण्यासाठी प्रार्थना केली जाते. हा दिवस पवित्र असल्याने या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणे चांगले असते. असा हा चैतन्याचा सण सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येतो.
Tags:what is the meaning of gudi padwa?,gudhi padwa saanabaddl mahiti,gudipadwa saan information in marathi,gudipadwa festival information,gudi padwa information in marathi,chaitra shukla prtipada (gudi oadwa),why do we celebrate gudi padwa,2017gudi padwa,gudhi padwa mahatv marathi,गुढी पाडवा महत्व ,
गुढीपाडवा सण माहिती, गुढीपाड्व्याबद्दल माहिती,गुढी पाडवा हिंदू नवीन वर्ष,happy gudi padwa,wishing happy gudi padwa
gody padwa info,godhy,gudhy padwa,guddy padawa
No comments:
Post a Comment