FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Friday, 27 October 2017

whatsapp Marathi suvichar, msg for life

मराठी सुविचार , मराठी मेसेज :


आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा
देवाने दिलेल्या घरात आपण राहतो हि भावना असावी,
देवाने आपल्याला काहीतरी दिले पाहिजे म्हणून
मंदिरात जाऊ नये ....
            तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय
            म्हणून मंदिरात जावे.

मराठी सुविचार images ,marathi suvichar images


जग गरजेच्या नियमानुसार चालत असते
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते ...
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो...
तुमची किंमत तेंव्हा होईल
जेंव्हा तुमची गरज लक्षात येईल.


Open आणि Close
किती विरोधी अर्थी शब्द आहेत
पण गंमत अशी आहे की,
आपले मन open त्याच्याजवळच होते
जो आपल्या Close आहे .


कोणाचीही स्तुती कितीही करा
पण अपमान खूप विचारपूर्वक करा
कारण अपमान हे असं कर्ज आहे
जे प्रत्येकजण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.


बळ आल्यावर प्रत्येक पाखराने आभाळात जरूर उडावे
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कस विसरावं
      एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
      एक व्यक्तिमत्व म्हणून जगा
कारण व्यक्ती कधी ना कधी संपते
पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते


हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे
नाहीतर डोळ्यातील अश्रुना पण डोळ्यात जागा राहत नाही
     आयुष्यात खूप सारे जण येतात , जातात...
     प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसत ....
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात ...
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसत





No comments:

Post a Comment