मराठी कविता संग्रह :
नमस्कार मित्रांनो ,
मानवाला आपल्या भावना समजावून सांगण्यासाठी शब्दांची खूप गरज असते... आणि जर हेच शब्द एका लयीत बसवून व्यक्त केले तर त्यांची मनावर खूप भारी पकड बनते... एका कवीने भावना व्यक्त करण्यासाठी रचलेल्या शब्दांची मिळून कविता होते... अश्याच काही छान कविता आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ... एकाच ठिकाणी .... आशा आहे कि तुम्हाला नक्की आवडतील ... प्रथम या कविता रचलेल्या सर्व कवींचे मनापासून आभार मानतो. जर तुम्हाला हि पोस्ट आवडली तर नक्की दुसर्यांना पण पाठवा.
१. परी मिळावी
मी कुठे म्हणालो 'परी' मिळावी
फक्त जरा 'बरी' मिळावी
प्रयत्न मनापासून आहेत मग
किमान एक तरी मिळावी
स्वप्नात तशा खूप भेटतात
कधीतरी खरी मिळावी ...
हवीहवीशी एक जखम
एकदातरी उरी मिळावी
गालावर खळी नको तिच्या
फक्त जरा हसरी मिळावी
चंद्राइतकी सुंदर नकोच
फक्त जरा लाजरी मिळावी
मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी
- मंगेश पाडगावकर
२.मनापासून
खूप प्रेम करते तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू
आपले मानून बघ
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी
तू फक्त सांगून बघ
आयुष्यभर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ
तुझ्यासाठीच जगत आहे
तुझ्यावरच मरत आहे
असला तरी नकार तुझा
तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे
वाटलेच कधी तुला तर
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करते...
तुझ्यावर अगदी मनापासून
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन,
जरा जागून बघ माझ्यासाठी
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील
मनापासून फक्त तुझ्यासाठी.
-सुवर्णा मेस्त्री
लव्ह मराठी कविता,love poem in marathi,marathi kavita
खूप प्रेम करते तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू
आपले मानून बघ
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी
तू फक्त सांगून बघ
आयुष्यभर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ
तुझ्यासाठीच जगत आहे
तुझ्यावरच मरत आहे
असला तरी नकार तुझा
तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे
वाटलेच कधी तुला तर
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करते...
तुझ्यावर अगदी मनापासून
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन,
जरा जागून बघ माझ्यासाठी
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील
मनापासून फक्त तुझ्यासाठी.
-सुवर्णा मेस्त्री
लव्ह मराठी कविता,love poem in marathi,marathi kavita |
३.विरह
हलकेच बरसा सरींनो
चिंब चिंब भिजलो आहे...
हळुवार या स्वप्नानो
आताच शांत निजलो आहे...
विश्राम घ्या पावलांनो जरा
चालुनिया दूर दूर थकलो आहे...
दुःखांनो कोसळू नका क्षणभर
हलकेच बरसा सरींनो
चिंब चिंब भिजलो आहे...
हळुवार या स्वप्नानो
आताच शांत निजलो आहे...
विश्राम घ्या पावलांनो जरा
चालुनिया दूर दूर थकलो आहे...
दुःखांनो कोसळू नका क्षणभर
घेऊनिया भार हा उरी , सर्वथा मी वाकलो आहे...
४. कणा
'ओळखलंत का सर मला' पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
'गंगामाई' पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन सांगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला
'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढा म्हणा'.
- कुसुमाग्रज
५. चुकली दिशा तरीही
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचो म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादकांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले कि अनुकूल सर्व वारे
मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे
अशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कसे डसणार हे निखारे
- विंदा करंदीकर
६. फुल
कुठेही असलं तरी
फुलाचं फुलून येणं
कुणासाठी थोडच असतं
आणि त्याच फुलाचं
कोमेजून गळून जाणं
त्याचाही कुणाशी
संबंध थोडाच असतो?
फुलांना माणसांनी
चिकटवलेली असोत नाव ,
आपलं नाव सांगताना
फुलाला पाहिलंय कोणी?
मी तुला एकदा फुल दिल होतं
तुला ते आठवत असेल
किंवा आठवत नसेलही
मला ते अजून आठवतं!
तीच आठवण आली म्हणून
हे सगळं आलं मनात
एखाद ताज फुल असं जरी
मनात आपल्या आपण जपून ठेवलं तरी
नावाची, आठवणीची लटकवलेली
आपली पाटी
फुल थोडंच वाचणार असतं?
No comments:
Post a Comment