FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Friday, 17 November 2017

होय मि लाभार्थी कविता,Poem on hoy mi labharthi

 होय मि लाभार्थी कविता 

 कवी जगदीश ओहोल जे की  यानि एक कविता मराठी  रचलि आहे "होय मि लाभार्थी".
सरकारने केलेल्या मी लाभार्थी ही जाहिरात बघून मनाला वीट आलाय अशी सर्वसामान्यांची भावना आहे.. याच सर्वसामान्यांच्या मनातील भावना महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व व्याख्याते जगदिश ओहोळ यांनी मी लाभार्थी या कवितेतून मांडल्या आहेत.

"Hoy Mi Labharthi Poem"


मी लाभार्थी ची जाहिरात बघून
आला मनाला वीट
नुसत्या जाहिराती दाखवुनच
सरकार झालेय हिट...!

मनरेगाच बघता बघता
जलयुक्त शिवार झालं
पण भिजवायच काय
समृद्धी महामार्गा सारं वावर गेलं..?

स्वप्नांचा सुकाळ
आणि जाहिरातीची समृद्धी आली
टिव्ही वरच पाणी बघूनच
बापानी पापणी ओली केली..

'या सरकारच पाणीच यगळंच'
हे आता साऱ्यांना पटलंय
आणि अच्छे दिनाच सपान
तीन वर्षातच फिटलंय...!

कर्जमाफीचा उत्सव तुम्ही
लयभारी मांडला
आज उद्या करत करत
शेतकरीच गंडला...।

व्हय मी लाभार्थी
तुमच्या खोट्या स्वप्नाचा
व्हय मी लाभार्थी
न आलेल्या अच्छे दिनाचा

व्हय मी लाभार्थी
न मिळालेल्या शिष्यवृत्तीचा
व्हय मी लाभार्थी
न बांधलेल्या वसतीगृहाचा

व्हय मी लाभार्थी
फक्त कुदळ मारलेल्या इंदूमिलचा
व्हय मी लाभार्थी
फक्त पाणी पूजलेल्या शिवस्मारकाचा

व्हय मी लाभार्थी
न मिळालेल्या मराठा
धनगर आरक्षणाचा
बंद केलेल्या पेन्शनचा

व्हय मी लाभार्थी
साठ हजाराच्या गाण्याच्या तिकिटांचा
व्हय मी लाभार्थी
अक्सिस बँकेच्या अकाउंट चा

व्हय मी लाभार्थी
उबग आलेल्या तुमच्या जाहिरातींचा
व्हय मी लाभार्थी
गरज नसलेल्या बुलेट ट्रेनचा

व्हय मी लाभार्थी
घोटाळा केलेल्या EVM चा
व्हय मी लाभार्थी
रिकाम्या पोटी 'मन की बात' चा

आता माझा एकच प्रश्न
मुख्यमंत्री सायेब तुमाला...
मी 'लाभार्थी' असायला
मी लाचार आहे काय..??

ही कामं करणं
ही तुमची जबाबदारी
अन ती झालीच पाहिजेत
हा माझा हक्क हाय...

खरे लाभार्थी तर तुम्ही हाय,
आम्ही जाहिरातीला फसून
दिलेल्या मतांचे
व्हय तुम्ही लाभार्थी
आमच्या जीवावर खुर्चीचे
ऐशोआरामी जगण्याचे
देशोदेशी फिरण्याचे
व्हय मुख्यमंत्री साहेब तुम्हीच लाभार्थी...!
WWW.FUNFORLIVES.COM

Special Thanks to,
कवी - जगदिश ओहोळ, पुणे
कविता मनापासून आवडली तर सर्वांना पाठवा.

 tags
Poem on BJP government,BJP insulting Poem,Mi labharthi bjp,मि लाभार्थी भाजपा ,कविता,kavita mi labharthi ,bharatiy janata party insulting poems

1 comment:

  1. खूपच छान अगदी बढीया सर

    ReplyDelete