FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Tuesday, 21 March 2017

मराठी कविता आई poem for mother in marathi font

Marathi kavita for Mother:

 

mazi aai marathi kavita:

"आई"
एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं ...

सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच
तरीही नाही म्हणवत नाही...

जत्रा पांगते पालं उठतात,
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेवून जाते काही,
जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेंव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात कि सैरावैरा धावायलाही कमी पडत रान ...

पिकं येतात जातात,
माती मात्र व्याकुळच ...
तिची कधीच भागात नाही तहान,
दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल
कि सापडते अंतःकरणातील खाण.

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात
गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?

आई खरंच काय असते ?
लंगड्याचा पाय असते
वासराची गाय असते
दुधावरची साय असते,
लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही
           - फ. मु. शिंदे 


आई,indian mother images,kavita aaisathi




Marathi poem on aai:

कळतच नव्हतं मला, 
माय माझी एकटीच का रडायची??? 
तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची.. 

माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची... 
काय पाहत होती कोणास ठाऊक
पण पदराखाली मला घट्ट धरून बसायची.

पाऊस नव्हता तरी सुद्धा माझ्या अंगावर थेंब पडायची, 
मांडीवर मला थोपटताना तिची का झोप उडायची .. 
काहीच नव्हते घरात तरी ती घराला फार जपायची, 
एकच होत लुगडं तिला तेच ती धुवून रोज नेसायची ..

सणावाराच्या दिवशी मात्र माझ्यावर करडी नजर ठेवायची,
जाऊ नये कुणाच्या घरी म्हणूंन मला घरातच लाडीगोडी लावायची.. 
रोजच सकाळी हात जोडून देवाला काहीतरी मागायची, 
गालावर हात फिरवून माझ्या बोटे तिच्या डोक्यावरती मोडायची..  

मातीच्या होत्या भिंती पांढऱ्या मातीनेच लिंपायची, 
अंगणात टाकायची सडा नि, 
घर शेणाने सुंदर सारवायची... 

सकाळीही रोजच मला घासून अंघोळ घालायची, 
चुलीवरच्या भाकरीचा घास तिच्या हातानेच भरवायची...  
शाळेत मला धाडताना स्वप्ने मोठमोठी बघायची, 
सांजच्याला थकायचा चेहरा तिचा तरी माझ्याकडे पाहून हसायची... 

कळतच नव्हतं मला, माय माझी एकटीच का रडायची 
तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची??



आई मराठी कविता :

आई तुझ्या कुशीत,पुन्हा यावेसे वाटते,
निर्दयी या जगापासून, दूर जावेसे वाटते ...
कोणी न इथे कोणाचा, सारीच नाती खोटी,
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते...
कोळून प्यायलो मी सुख दुःख सारे,
माते तुझ्या विरहास प्यावेसे वाटते..
कित्येक रात्री ऐश्वर्यात लोळलो मी,
अखेरच्या क्षणाला तुझ्या कुशीत निजावेसे वाटते..
दगडातला देवही आता ,नवसाविना पावेन,
निस्वार्थ हृदय माउली, तुलाच पूजावेसे वाटते..
असेल जर मजला मानव जन्म कधी,
आई तुझ्याच जन्मी पुन्हा जन्मावेसे वाटते.




Marathi kavita aai sathi:

"आई"
सकाळी सकाळी धपाटे घालून उठवते...
ती असते आई
उठल्या उठल्या आवडीचा नाश्ता बनवून देते...
ती असते आई
नाश्ता संपवायच्या आत डब्याची काळजी घेते...
ती असते आई
काय करीन ते घेऊन जा म्हणताना सगळं काही आवडीचे करून देते...
ती असते आई
साडीला हात पुसत व्यवस्थित जा म्हणते...
ती असते आई
परतण्याची आतुरतेने वाट बघत असते...
ती असते आई
आपण झोपेपर्यंत सतत जागी राहते..
ती असते आई
आणि जिच्याशिवाय आपलं संपूर्ण आयुष्यच अपूर्ण असते...
ती असते आई



Tags:great marathi kavita,marathi kavita on aai,poem for mother,beautiful marathi poem on mother,aai vr marathi kavita,marathi kavita aai sathi,mazi aai marathi kavita,marathi kavita aai baba,marathi poem for mother,आई मराठी कविता,
आईसाठी कविता,कविता माझ्या आईसाठी,सुंदर मराठी कविता आईसाठी 

3 comments:

  1. Amazing ye.. Really
    Dolyat pani yeil aslya kavita sangrah ahe

    ReplyDelete
  2. Amazing ye.. Really
    Dolyat pani yeil aslya kavita sangrah ahe

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanywad... tumcha feedback amchyasathi khup important ahe.

      Delete