FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Saturday, 1 April 2017

great story of life cycle...mind it

एक असतो उद्योगपती,
सकाळी घाई गडबडीत तो घराच्या बाहेर निघतो,



गाडीचे दार उघडतो आणि दार उघडता उघडता गाडीखाली एक कुत्रं बसलेलं असतं त्याच्या पायावर याचा पाय पडतो, आणि ते कुत्रं त्याला जोरात चावते.....


आता त्याला भयंकर राग येतो १०-१२ दगड उचलून तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो पण त्या कुत्र्याला एकही दगड लागत नाही.....,
       ते जातं पळून....
.
मग हा उद्योगपती रागा-रागात ऑफीस मध्ये जातो आणि सगळ्या मैनेजर लोकांची मिटींग बोलावतो आणि त्या कुत्र्याचा राग त्यांच्यावर काढतो.....



मग म्यानेजर लोकं ही पिसाळतात उगाच काही कारण नसताना बॉस ने शिव्या घातल्या......


मग ते म्यानेजर लोकं त्यांच्या खालच्या लोकांवर जाळ काढतात.....


मग अस करत करत ती सायकल प्यून (नोकर) पर्यंत येते......





आता प्यूनच्या खाली कोणच नसते ना....,
ऑफिस मधून मग तो जरा टाकून घरी जातो....



दार वाजवतो बायको दार उघडते … आणि विचारते.…
एवढा उशीर ...?
तो  बायकोला एक कानाखाली टाकतो...
आणि म्हणतो मी काय गोट्या खेळतो का ऑफीस मध्ये ? …




कामं असतात मला …. डोकं नको फिरवू… चल जेवायला वाढ.....

आता बायको पिसाळते..…
काहीही केले नसताना कानाखाली खाल्ली …




ती आपली किचन मध्ये जाते आणि पोरग आपलं मध्ये मध्ये येत असत म्हणून ती पोराला बदा-बदा मारते....
तिने राग काढला पोरावर….
आता पोरग काय करणार ?
ते आपलं चाचपडत घरा बाहेर जातं....


आणी.........
आणी.........

आणी.........




            एक दगड उचलतं आणि पुढे एक कुत्र असते त्याला जोरात दगड मारतं !!
मित्रांनो तेच ते सकाळच कुत्रं !!!

त्याला दगड लागणारच होता फ़क़्त उद्योगपती कडून न लागता त्या  पोराकडून लागला. त्याचे सर्कल कंपलिट झाले.....!
त्यामुळे काळजी करू नका तुमाला कोणीही त्रास देवो,
त्याला दगड लागणार…..
नक्की लागणार....
त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा
आपले वाईट करणाऱ्याचे
वाईट होणारच..

tags
karni taisi bharni story,jase karave tase bharave stories,जसे करावे तसे भरावे स्टोरी,मराठी गोष्टी गोष्ट ,करणी तशी भरणी marathi story

No comments:

Post a Comment