FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Wednesday, 22 March 2017

बेस्ट मराठी कविता

Marathi poem on life in marathi font:

Marathi poem for kids:

ए आई मला पावसात जाऊ दे,
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होउ दे..
मेघ कसे बघ गडगड करिती,
विजा नभांतुनी मला खुणविती,
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचू दे..
खिडकीखाली तळे साचले
गुडघ्याइतके पाणी भरले
तर्हेतर्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावू दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करू दे
धारेखाली उभी राहुनी
पायाने मी उडवीन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी वाटेल ते होउदे
ए आई मला पावसात जाऊ दे



Marathi poem on childhood
भूतकाळात डोकावल्या शिवाय
मजा काही मिळत नाही
मागे वळून पाहिल्यावर
हसावं का रडावं कळत नाही
old days marathi poem
साऱ्याच गोष्टी मधे
खूप खूप बदल झाले
पहिल्या पेक्षा प्रत्येकाला
नक्कीच बरे दिवस आले
marathi poem on change
खरं वाटणार नाही पण
एवढं सगळं बदललं
निगरगट्ट माणूस सुद्धा
मुळा सकट हादरलं
childhood study poem
शाळेतून घरी गेल्या गेल्या
दप्तर कोनाड्यात जायचं
दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना
बाहेर काढल जायचं
childhood memories poems
अहो दप्तर म्हणजे काय
वायरची पिशवी असायची
जुन्या फाटक्या पुस्तका सोबत
फुटकी पाटी दिसायची
old days study marathi kavita
अभ्यास कर म्हणून कुणी
म्हणलंही नाही
अन मार्क कमी पडले म्हणून
हाणलंही नाही
poor but happy kavita poem
कोणताही ऋतू असो
काळपट चहा असायचा
तडकलेल्या बशीवर
कानतुटका कप दिसायचा
marathi poem on poority is happinesses
बारा महिने अनवाणी पाय
चप्पल म्हणजे श्रीमंती
पायाला चटके बसायचे
पण सगळ्या गावात हिंडायचे
कुणाचं गुर्हाळ लागलं की
चला रस प्यायला
खळे दळे लागले की
चालले शेतात झोपायला
family poem marathi
मरणाची गरिबी होती
पण मजा मात्र खूप
लग्ना कार्यात माणसं , नाती
व्हायची एकरूप
तेलच्या-गुळवणी आणि पापडांची
काय मामलात होती
तरीही त्या माणसां मधे
माणुसकी होती
रात्र रात्र गप्पा व्हायच्या
डोळ्यात यायचं पाणी
आडपडदा न ठेवता
दुःखाची व्हायची गाणी
olden days are golden days marathi poem
कुठे गेला तो साधेपणा
कुठे गेलं ते सुख  ?
खरं सांगा पहिल्या सारखी
लागते का आता भूक ?
इतकुसाक पेढ्याचा तुकडा
मिडकू मिडकू खायचा
कधी तरी कुणी तरी
प्रसाद म्हणून द्यायचा
junya divsanvar marathi kavita
सारं सारं संपून गेलं
आता पैसा बोलत असतो
माणूस मात्र भ्रमिष्ठा सारखा
खोटं खोटं डोलत असतो
पेढ्याच्या बाॅक्स कडे
ढुंकूनही कुणी पहात नाही
एवढंच काय पहिल्या सारख्या
मुंग्याही लागत नाही
सुखाचं बोट कधी सुटलं
आपल्या लक्षात आलं नाही
श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं
तसं काही झालं नाहीे
ते सुख आणि वैभव
पुन्हा घरात येईल का ?
आईच्या घरा  मधून
हसण्याचा आवाज येईल का?

मराठी विनोदी कविता:

कोंबडीच्या अंड्यामधून
बाहेर आले पिल्लू ,
अगदी होते छोटे
आणि उंचीलाही टिल्लू...

कोंबडी म्हणाली पिल्लूबाय 
सांग तुला हवे काय?
किडे हवे तर कोडे,
दाणे हवे तर दाणे 
आणून देईन तुला हवे असेल ते खाणे... 

पिल्लू म्हणाले आई 
दुसरे काही नको 
छोट्याश्या कपामध्ये चहा भरून दे 
मला एका अंड्याचे ऑम्लेट करून दे. 
🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤

Marathi kavita on life:

घरात टि व्ही आल्यापासून मी बोलणं विसरलो आहे 
दारात गाडी आल्यापासून मी चालणं विसरलो आहे 
खिशात calculator आल्यापासून पाढे म्हणणं विसरलो आहे 
ऑफिसमधल्या ए सी मध्ये बसून झाडाखालचा गारवा  विसरलो आहे

रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलो आहे 
मनालाच इतके श्रम होतात शरीराचे कष्ट विसरलो आहे
कचकड्यांची नाती जपताना प्रेम करायला विसरलो आहे 
बॅंकातली खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरलो आहे 

उत्तेजक चित्रांच्या बरबत्तीमुळे सौन्दर्य पहाणं विसरलो आहे 
कृत्रिम सेंटच्या वासामुळं फुलांचा सुगंध विसरलो आहे 
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचा ढेकर विसरलो आहे 
पॉप रॉकच्या दणदणाटात संगीत समाधी विसरलो आहे 

सतत धावत असताना 
क्षणभर थांबणं विसरलो आहे 
जागेपणीचे सुख जाऊच द्या 
सुखं झोपणं विसरलो आहे.  





Tags:marathi kavita on life,marathi funny poem,marathi poem for kids,chidhood memories best marathi poem,best marathi kavita,marathi kavinchya kavita marathi fontmadhe,मराठी विनोदी कविता

No comments:

Post a Comment