FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Monday, 30 January 2017

Husband wife fighting jokes marathi


HUSBAND WIFE FUNNY FIGHT/DEBATE JOKES

😂😂😂😂😂😂😂😂
सकाळी एका पतीने 👨🏻आपल्या पत्नी 👩🏻 ला उठवलं.....

👨🏻:- डार्लिंग चला उठा.. आपण योगा क्लास ला जावूया... 😌

👩🏻:- का हो.. मी तुम्हाला एवढी लट्ठ दिसते की काय..?😠😡😡

👨🏻:- तसं नाही गं.. योगा हे निरोगी राहण्यासाठी... आपल्या फिटनेस साठी छान असतं..😊

👩🏻:- म्हणजे मी अनफिट आहे... आजारी आहे.. असं म्हणायचंय तुम्हाला..😠😡😡

👨🏻:- जावू दे.. नसेल उठायचं तर...😏

👩🏻:- याचा अर्थ काय.? तुम्ही मला आळशी समजता की काय..?😨

👨🏻:- हे बघ, तुझा गैरसमज होतोय..😐

👩🏻:- अरे देवा..
म्हणजे मला अक्कलच नाही.. इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला.. आणि तुम्हीं म्हणताय मी तुम्हाला समजूं शकले नाही... माझा गैरसमज होतोय..😱

👨🏻:- अगं मी तसं म्हणालो काय..?😰

👩🏻:- म्हणजे.... मी खोटं बोलत आहे तर..😲😓

👨🏻:- ओके ओके... जाऊ दे..
सकाळी सकाळी वाद कशाला..😓

👩🏻:- मी वाद घालते ?
मी वाद घालते.. ?
तुम्हाला वाटतयं मी भांडखोर आहे...?😖😳

👨🏻:- ठीक आहे... मी ही जात नाही फिरायला... योगा कैन्सल..😟

👩🏻:- बघितलत, मुळात तुम्हाला जायचंच नव्हतं.. फक्त माझ्या डोक्यावर खापर फोडायचं होतं...😣😥

👨🏻:- बरंय.. मी एकटाच जातो.. तू झोप आनंदात... 😏

👩🏻:- जा जा..
एकटेच जा..
तसंही तुम्ही एकटेच सगळी मौज करता.. 
कधी माझी फिकिर केलीय का तुम्ही... 😱😫

👨🏻:- आता माझं डोकं गरगरतंय... चक्कर येतेय मला...😁

👩🏻:- येणारच... स्वार्थी आहात तुम्ही.. नेहमी स्वत:पुरताच विचार करता नां..!
बायकोच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला...!
चक्कर येणारच..!
🙆🙅🙅🙆

पती 👨🏻 मौन..😷
पत्नी 👩🏻झोप.. 😴
Http://Www.funforlives.com
=================
सर्व पत्नीप्रेमी पतींना समर्पित.. 🙏🌹🙏
=================
tags
Marathi jokes,marathi funny vinod chutkule,jokes,marathi husband-wife jokes,vinod,pati patni vinod,jokes,fighting jokes,marathi big jokes,funny husband wife skit

No comments:

Post a Comment