FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Sunday, 12 March 2017

त्वचा सुंदर बनवण्यासाठी उटणे लावण्याचे फायदे.

उटणे लावण्याचे महत्वाचे फायदे:


आपण लहानपणापासून उटणे फक्त दिवाळीच्या वेळी वापरत आलेलो आहोत. दिवाळीच्या वेळी उटणे लावून पहाटे अभयंगस्नान करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जर आपण फक्त दिवाळीपुरता उटण्याचा वापर न करता रोज जरी उटणे वापरले तर त्याचे आपल्यला खूप सारे फायदे आहेत. आपली त्वचा तेजस्वी आणि चमकदार बनवण्यासाठी उटणे खूप फायदेशीर आहे. उटण्याचे काही महत्वाचे फायदे मी आपल्यासाठी खाली देत आहे. 

glowing skin,indian beauty, natural beauty of skin,utne lavnyache fayade,sunder honyache  upay


१) तेजस्वी चेहरा :  

उटणे हे एका scrubber  प्रमाणे काम  असल्याने काळवंडलेली त्वचा तेजसवी होण्यास खूप मदत होते. तसेच जर आपण बेसन आणि चंदन यासोबत वापरले तर त्वचेची Quality सुधारण्यास मदत होते. आणि यामध्ये जर दूध मिक्स केले तर त्वचेला कांती मिळते. 


२) स्वच्छ त्वचा:

स्वच्छ, निरोगी  त्वचा हा तेजस्वी दिसण्याचा एक मूळमार्ग आहे. उटण्यातील आयुर्वेदिक घटकांमूळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी ऍक्ने ,पिगमेंटेशन ,स्कार्स कमी होण्यास मदत होते. सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेम्ब मिसळणे फायदेशीर असते.

natural beauty,glowing skin methods,remedy to skin glowing


३) चेहऱ्यावरील केसांची वाढ रोखते:

चेहऱ्यावरील केस स्त्रियांच्या सौन्दर्यात अडथळा निर्माण करतात. तर चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक भारतीय स्त्रिया उटण्याचा वापर करतात. उटण्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. पण उटण्याने मसाज करताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. 
त्वचेचे सौन्दर्य अधिक खुलवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, सुकवलेल्या संत्र्याची सालीची  पेस्ट आणि उटणे यांचे  एकत्र मिश्रण बनवून त्याचा हलका मसाज चेहऱ्यावर करावा. 

४)  त्वचेवरील  सुरकुत्या कमी होतात:

त्वचेवर सुरकुत्या येणे म्हणजे वाढत्या वयाची निशाणी असते.आणि चेहऱ्यावर सुरकुत्या आलेले कोणालाच आवडत नाही. उटणे लावणे हा यावर एक खूप चांगला उपाय आहे. 

hoe to get fair skin,hoe to overcome scars on skin,fair and clean skin for men


उटणे लावण्याच्या पद्धत:

१) सुंगंधी उटणे प्रमाणात घ्या. 
२) उटण्यामध्ये दुधाची साय ,दूध ,गुलाबजल, सुगंधी तेल मिश्रित करून त्याचा लेप तयार करा. तेलकट त्वचेसाठी  डाळीचे पीठ मिक्स करून वापरा. 
३) उटण्याचा लेप सर्व अंगाला लावा. वाळल्यानंतर मसाज करून मळी काढा. 
४)  नंतर अंघोळ करा. त्वचा तेजस्वी होईल. 

उटणे बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक:

कपूरकाचली ,नागरमुथा,दवणा,मरवा ,वाळा ,आंबेहळद,खस ,तुलसी पावडर,आयुर्वेदिक साहित्य. 


Tags:soundary vadhvnyasathi gharguti upay,सौन्दर्य वाढवण्यासाठी घरगुती उपाय , सुंदर होण्याचे काही घरगुती उपाय,उजळ कांती हवी,kale dag upay in marathi,pimple upay in marathi,gharguti upay for skin in marathi,beauty tips for face pimple in marathi



No comments:

Post a Comment